प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: सध्या राज्यभरात 'ऑक्टोबर हिट'चा मोठा तडाखा जाणवत असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. मात्र, या तापलेल्या वातावरणात आता एक अचानक आणि मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार, राज्यात आगामी २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये नवीन हवामान प्रणाली सक्रिय होत आहे. या नव्या प्रणालीमुळेच येत्या २७, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये धो धो पाऊस कोसळू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन आठवड्यांच्या काळात कोकण पट्ट्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. तसेच, आज सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे पावसाचे संकेत मिळत असले तरी काही भागांत उकाड्याचा त्रास कायम आहे. सध्या पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या पट्ट्यामध्ये उष्ण तसेच दमट हवामानाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात आज तरी प्रामुख्याने उष्ण वातावरणच पाहायला मिळणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पुढील किमान दोन दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लीप प्रकरण: ‘हा भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना?’, सुषमा अंधारेंचा घणाघात
- वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर मुरली कार्तिक नाराज; संघ व्यवस्थापनावर उपस्थित केले प्रश्न
- न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने उलगडले यशाचे गुपित; म्हणाला, “संपूर्ण भारताचा तुझ्यावर…”



